सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : काल मंगळवार दि.८ मार्च जागतिक महिला दिन,याच दिनाचे औचित्य साधून राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. चंद्रपूर जिल्ह्यातही महिला जागतिक दिनानिमित्त विविध स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणां-या महिलांचा गाैरव व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यांत आले हाेते.
एकी कडे विविध नामवंत सामाजिक संस्था कडुन आज जागतिक महिला दिनाचे जिल्हाभर आयोजन झाले असतांनाच याच दिवशी चंद्रपूर शहरातील वंचित बहुजन महिला आघाडीचे वतीने स्थानिक गांधी चाैकातील मनपा कार्यालया समाेर दुपारी १२ वाजता महिलांनी शहरातील मुख्य मार्गावर शाैचालय उभारा या साठी लक्षवेधक आंदोलन केले. सदरहु आंदोलन वंचित बहुजन महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षा तनुजा रायपूरे, उपाध्यक्षा सुलभा चांदेकर, महासचिव माेनाली पाटील, व डॉ.शरयु पाझारे यांचे नेत्रूत्वाखाली पार पडले. महिला मंडळाच्या एका शिष्टमंडळाने दुपारी मनपाचे आयुक्त यांची भेट घेवून त्यांना एक मागण्यांचे निवेदन सादर केले .विशेष बाब अशी की या पूर्वी याच महिला आघाडीने मनपाला रास्त मागण्यांचे संदर्भात एक निवेदन दिले हाेते, परंतु मनपाच्या काेणत्याही वरिष्ठ अधिका-यांनी या कडे लक्ष पुरविले नसल्याचे तनुजा रायपूरे यांनी या वेळी सांगितले.
येत्या १५ दिवसांत मागण्यांची पुर्तता झाली नाही तर मनपा समाेर शहरातील महिलांना साेबत घेवून ठिय्या आंदोलन करण्यांचा इशारा तनुजा रायपुरे, सुलभा चांदेकर, माेनाली पाटील यांनी दिला आहे. दरम्यान कालच्या या लक्षवेधक आंदाेलनात इंदु डाेंगरे, चंद्रप्रभा रामटेके, शाेभा वाघमारे, ललिता दुर्गे, सुनिता नगराळे, निलुताई शेळके, पाेर्णिमा शेळके इंदिरा खाेब्रागडे व वंचित बहुजन महिला आघाडीच्या सदस्यांनी भाग घेतला. काल हे आंदोलन शहरातील नागरिकांत एक चर्चेचा विषय ठरले.
एकीकडे शहरात जागतिक महिला दिन थाटात साजरा हाेत असतांना या महिलांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी काल मनपावर धडक दिली. मनपा परिसरात या वेळी पाेलिस प्रशासनाकडुन चाेख पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता.
जागतिक महिला दिनीच शाैचालयासाठी चंद्रपूरात वंचितच्या महिलांची मनपावर धडक!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2022
Rating:
