शिबला येथील कबड्डीच्या खुल्या सामन्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : शिबला येथील मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने हनुमान करपते यांचे पटागणावर भव्य कबड्डीचे खुले सामने आयोजीत करण्यात आले होते.कबड्डी सामन्याचे उद्घाटन मा.आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार साहेब यांचे हस्ते करण्यात आले.

उद्घाटनाला मा.सुरेशभाऊ बोलेंवार प.स.सभापती मा.राजुभाऊ गोंड्रावार प्रिया भोयर ,धर्मा आत्राम मा.पांडुरंगभाऊ पोयाम अ.भा.आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष, शिबला शाखा अध्यक्ष प्रकाश मेश्राम, अजय कोवे, सीताराम तलांडे, विशाल आत्राम, हनुमंत मडावी, मधूकर मडावी, अजय नेहारे, मंगल पु साम, नामदेव आडे, बंडू आडे, विदेश मेश्राम,शामराव सोयाम, श्रावण गेडाम, बळीराम कोडापे, केलास मडावी,उमेश परत म , गंगाधर मडावी, विलास मरस्कोले, विनोद आत्राम, यांचे उपस्थित करण्यात आले आणि बक्षीस वितरण कार्यक्रम श्री पांडुरंग भाऊ पोयाम अ. भा.आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष यांचे उपस्थितीत प्रथम पुरस्कार जय पेरसापेन मंडल कटलीबोर गाव तीस हजार रुपये,मां. आमदार संजीव रेड्डी बोदकुर्वार साहेब, सुरेश भाऊ बोलेन वार यांचे कडून द्वीतिय पुरस्कार जय बजरंग मंडल पारडी बी. वीस हजार रुपये, राजू भाऊ गोंड्रावार प.स.सभापती दीपक राय व कपिल कुंघाटकर यांचे कडून, तृतीय पुरस्कार मित्र क्रीडा मंडळ शिबला पंधरा हजार रुपये, वनविभाग शिबला वीरेंद्र पवार, व धन सिंग गाहरवाल,स्वप्नील कोडापे यांचे कडून, चतुर्थ पुरस्कार जय परसापेन मंडल दाभाडी (लहान) दहा हजार रुपये, अजू कोवे यांचे कडून देण्यात आले.

या कबड्डी वितरणाच्या कार्यक्रमाला मित्र क्रीडा मंडळाचे पदाधिकारी अजय नेहारे, व प्रकाश मेश्राम, सूरज शिडाम, गजानन मेश्राम, शुभम कुळसंगे, मारोती मडावी, रामप्रसाद कोडापे आणि ग्रामवासी शिबला यांचे सहकार्य लाभले. कबड्डी स्पर्धेत संचालन प्रभुदास सुरपाम यांनी तर आभार प्रदर्शन विशाल आत्राम यांनी केले.
शिबला येथील कबड्डीच्या खुल्या सामन्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न शिबला येथील कबड्डीच्या खुल्या सामन्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on March 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.