सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : वंचितने महिलांसाठी सुरक्षित व स्वच्छ महिला शाैचालय मुख्य रस्त्याच्या मार्गावर निर्माण करा ही मागणी उचलून धरली हाेती. परंतु प्रशासनाने या रास्त मागणी कडे लक्ष पुरविले नाही त्यामुळे शहरातील वंचित महिला आघाडीने चंद्रपूर नगरीत जागतिक महिला दिनी आंदोलन छेडून प्रशासनाचे या मागणी कडे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ मार्चला हे आंदोलन स्थानिक मनपा कार्यालया समाेर सकाळी १२ वाजता हाेत असल्याची माहिती आज रविवारला वंचित महिला आघाडीच्या प्रमुख तनुजा रायपूरे यांनी एका पत्रकातुन दिली आहे.
या आंदाेलनात वंचितच्या महिला पदाधिकारी व सदस्या माेठ्या संख्येने सहभागी हाेत आहे.
महिला जागतिक दिनी चंद्रपूरात हाेतेय आंदाेलन !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 06, 2022
Rating:
