टॉप बातम्या

मुलांमध्ये शिक्षणाचे महत्त्व वाढविण्यासाठी सूरमाज फाउंडेशनच्या वतीने दप्तरांचे वाटप

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

अक्कलकुवा : सूरमाज फाऊंडेशन नेहमीच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करते आणि एकमेकांना बंधुभावाने वागवण्याची जनजागृती करीत असते, यावेळी फाऊंडेशनचे डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मदरसा नुरुल इस्लाम मोठी राजामोई अक्कलकुवा येथील दोनशे विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांना अभ्यासाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी बैग दिल्या आणि सांगितले की, केवळ चांगली नोकरी मिळाली म्हणून नाही तर चांगल्या गोष्टी ओळखून जीवन जगण्याची पद्धत शिकली पाहिजे. मोठ्या आणि धाकट्यांचा आदर करायला शिका, सर्व धर्मांचा आदर करायला शिका आणि एकमेकांसोबत बंधुभावाने राहायला शिका आणि ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना शिक्षणाचे महत्त्व शिकवा आणि जे आपल्याकडे आहे ते कायदेशीररित्या मिळवायला शिका.
बॅग मिळाल्याने सर्व मुलांनी आनंद व्यक्त केला व हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन) यांचे आभार मानले व सूरमाज फाऊंडेशनच्या शब्दाचे पालन करू असे सांगितले. त्यामुळे डॉक्टर मोहम्मद जुबेर शेख व शेख शमीम मोहम्मद उस्मान यांनी मौलाना हारून साहब, मौलाना अरफात साहब, हाफिज अब्दुल मुतली साहब, मौलाना सैफुल्लाह साहब, अकीब अली मकरानी भाई, शेर मोहम्मद मकरानी साहब, फकीर मोहम्मद मकरानी साहब अजर भाई मकरानी व सरफुद्दीन दादा मकरानी यांच्या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.
Previous Post Next Post