युक्रेन वरून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली आ.बंटी भांगडीयांनी भेट !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील आंबोली चौरस्ता येथील हर्षल बळवंत ठवरे व शंकरपूरच्या ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे हे दोन विद्यार्थी युक्रेनला एमबीबीएस शिक्षण घेत होते. याच कालावधीत युक्रेन आणि रुस यांच्यात युद्ध सुरू झाल्याने त्यांचे आई वडीलांसह अख्खे कुटुंबातील सदस्यगण चिंतेत पडले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगा ऑपरेशनच्या माध्यमांतुन भारतातील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात ते यशस्वी ठरले अाहेत. त्यात चिमूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश हाेता. नुकतेच हर्षल बळवंत ठवरे व ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे हे मायदेशी आपल्या घरी सुखरूप परतले आहे.
  
चिमरचेू आमदार बंटी भांगडीया यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह चौरस्ता आंबोली येथील बळवंत ठवरे यांच्या घरी जाऊन त्यांचे परिवाराची भेट घेतली. दरम्यान नागपूर वरून प्रफुल खोब्रागडे हे आपल्या मुलीला परत आणत असताना चौरस्ता आंबोली येथे भेट झाली.

बळवंत ठवरे यांच्या निवासस्थानी हर्षल ठवरे व ऐश्वर्या खोब्रागडे या युक्रेन वरून मायदेशी परत आलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन सहानभूतीने त्यांची विचारपूस केली.

यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, माजी नगरसेवक सतीश जाधव भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले निलेश गभने राजू बानकर सुनील किटे बळवंत ठवरे, प्रफुल खोब्रागडे, पत्रकार जगदीश पेंदाम आदीं उपस्थित होते.
युक्रेन वरून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली आ.बंटी भांगडीयांनी भेट ! युक्रेन वरून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली आ.बंटी भांगडीयांनी भेट ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.