सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
उदगीर : सुवर्णकार बालाजी उदगीर येथील लेखिका सौ. अर्चना गोपाळकृष्ण नळगीरकर यांना मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्या तर्फे काव्यार्चन या त्यांच्या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उस्मानाबाद येथे झालेल्या सोहळ्यात खासदार ओमराजे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विचारपीठावर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश घुमटकर, ललिता गवांदे, राष्ट्रीय उपाध्यक्षा नीलिमा जोशी, राष्ट्रीय सरचिटणीस इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा अर्चना ताईचा पहिलाच कवितासंग्रह असून त्याला स्नेहल पाठक माजलगाव यांची प्रस्तावना असून उदगिर चे साहित्यिक डॉक्टर संजय कुलकर्णी यांची पाठराखण आहे. हे पुस्तक गणगोत प्रकाशन देगलूरच्या पांडुरंग पुठ्ठेवाड यांनी प्रकाशित केले आहे. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. अर्चना ताई नळगीर कर या उदगीर येथील नामांकित लेखिका असून त्यांच्या अनेक कथा व कवितांना अनेक बक्षिसे प्राप्त झालेली आहेत. तसेच अर्चना ताई नळगीरकर ह्या साहित्यिक सखि या साहित्यिक ग्रुपच्या संयोजिका आहेत. योग्य व्यक्तीच्या योग्य साहित्य कृतीस हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवितेच्या बनाचे मुख्य संयोजक अनंत कदम, बारा बलुतेदार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर, संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर चे सचिव बालाजी सुवर्णकार, तसेच प्राध्यापक नरेंद्र कटारे, सहशिक्षक संजय पांचाळ, प्राध्यापक शशिकांत जाधव, ज्ञानेश्वर लोहारे, जळकोट येथील प्राचार्य बी.टी.लहाने, संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार महिला मंचच्या अध्यक्षा स्मिता ताई पोतदार, उपाध्यक्षा अर्चना पेनुरकर, उज्वला अंबेकर, कोषाध्यक्षा भारतीबाई रत्नपारखे, सहसचीव उर्मिला रत्नपारखी व सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार, सदस्य सुनिता सुवर्णकार, मंजुषा सुवर्णकार, सारिका सुवर्णकार, सुरेखा केजकर व तसेच संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे अध्यक्ष विजयकुमार पेनुरकर, सूर्यकांत आंबेकर, सहसचिव एकनाथ रत्नपारखी,कोषाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी, सदस्य प्रभाकर सुवर्णकार, दामोधर सुवर्णकार, गणेश केजकर, संतोष नखाते, बालाजी घोलेकर, सचिव बालाजी सुवर्णकार व संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार युवक मंडळाचे नूतन अध्यक्ष अच्युत पंडित, उपाध्यक्ष भागवत पोतदार व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांनी त्यांचे कौतुक केले असून अर्चना ताई नळगीरकर यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल उदगीर शहरासह अनेक ठिकाणी त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.