सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
उदगीर : सुवर्णकार बी. ऐन.दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिलीप रामचंद्र महतकर यांची कन्या प्रणिता दीलीप महतकर अमरावती (सौ. प्रणिता स्वप्नील अंजनकर) यांनी नुकतीच पीएचडी प्राप्त केली आहे. प्रणिता हिने प्राणिशास्त्र या शाखेतील बायोकेमिकल आणि सायकॉलॉजिकल इन्वस्तिगेशन ऑफ हिमोलिन इन मिलीपिड स्पेशिज या विषयात श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आतून पीएचडी प्राप्त केली आहे.
डॉ.शारदा देशमुख (HOD)प्राणीशास्त्र विभाग . बार रामराव देशमुख कला श्रीमती इंदिराजी कपडिया वाणिज्य आणि न्याय. कृष्णाराव देशमुख विज्ञान महाविद्यालय बडणे अमरावती (MS) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. त्यांना पि एच डी प्राप्त झाल्याबद्दल श्री संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ, उदगीर जिल्हा लातूर च्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून तिची सर्वत्र लातूर जिल्ह्यात सोनार समाजाच्या वतीने कौतुक होत आहे.
यावेळी श्री संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे अध्यक्ष सचिन पोद्दार, उपाध्यक्ष विजयकुमार पेनुरकर, सूर्यकांत आंबेकर, सचिव बालाजी सुवर्णकार, सहसचिव एकनाथ रत्नपारखी, कोषाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी यांच्यासह इतर सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रणिता महतक रपुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिले आहेत.
प्रा प्रणिता महतकर यांना पीएचडी प्राप्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 06, 2022
Rating:
