सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनोजा येथील उपसरपंच जनार्धन गाडगे यांच्या नेतृत्वात गावातील जेष्ठ नागरिकांनी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांना गावातील विविध कामासंदर्भात आपल्या फंडातून अर्थसहाय्य करा या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना उपसरपंच जनार्धन गाडगे, प्रकाश पिदूरकर, बंडू पुनवटकर, पांडुरंग राजूरकर, हरिदास नगराळे, पुंडलिक शेडामे, इत्यादी उपस्थित होते.
तालुक्यातील वनोजा (देवी) येथील काँक्रीट रोड व इतर विकास कामे, वनोजा ते आपटी शेत पांदण रस्ता तसेच गावातून जाणारा (pwd) चा रास्ता, इत्यादी कामासाठी निवेदन देण्यात आले असून
आमदार बोदकूरवार यांनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत, कामे लवकरच मंजूर करू म्हणून
हमी दिली.
आमदार फंडातून अर्थसहाय्य करा - वनोजा ग्रामवासियांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 06, 2022
Rating:
