सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखल्या जातो. या तालुक्यातील बहुतांश कुटुंबे ही रोज मजुरीवर किंबहुना हातावर आणून पानावर खाणारे असून, आपल्या कुटुंबाची उपजिविका कशी बशी करीत आहे. अनेकांना राहण्यासाठी साधे घर सुध्दा नाहीत. त्यामुळे शासनाने प्रत्येकाला हक्काचे घर मिळावेत, या करीता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल दिल्या जात आहे.
ग्रामपंचायतस्तरावरून पात्र निवड कुटुंबाची यादी तयार करण्यात आल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना घरकूलचा लाभ मिळणार आहे, परंतु ह्या घरकुल लाभार्थ्यांना फक्त १,२०,००० रुपये एवढेच अनुदान मिळणार असल्याने एवढ्या कमी अनुदानात घरकुल पूर्ण करायचे कसे अशी चिंता सताऊ लागल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहेत. आजघडीला रेती, सिमेंट, सळाख, विटा, व लागणाऱ्या इतरही साहित्याच्या किंमतीत खूप वाढ होवून त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच घरकुल बांधकाम करणाऱ्या गवंडी, मजुरांची मजुरी ही खूप महागल्याने शासनाकडून मिळणारे अल्पसे अनुदान यात खरच आम्हचे घर पूर्ण होतील का ? की "घर उकलून मांडव टाकल्या गत" परिस्थिती तर आमच्या वर येणार तर नाहीत, यांची चिंता सर्वच घरकुल लाभार्थ्यांना लागल्याचे चित्र दिसून येत आहेत.
एकीकडे महागाई व तर दुसरीकडे अल्पसे अनुदान यात खरच आम्हच्या घराचे स्वप्न, घरकुल पूर्ण होतील काय? की, नाहीतर घर पाडून बेघर होवून उघड्यावर कुटुंबे घेवून राहण्याची वेळ येईल का? असे अनेक प्रश्न आज रोजी घरकुल पात्र लाभार्थ्यांना पडले आहेत. त्यामुळे या महागाई चा सखोल अभ्यास करून घरकुल अनुदानात वाढ करावीत. नाहीतर सर्व तालुक्यात शासनाला कोणत्याही लाभार्थ्यांचे घर पूर्ण झाल्याचे चित्र दिसणारच नाहीत. असे दिसू नये याकरिता शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
अल्पशा अनुदानाने वाढली घरकुल लाभार्थ्यांची चिंता; घरकुल साहित्याचे भाव भिडले गगनाला!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 07, 2022
Rating:
