सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : येथील सुप्रसिद्ध मूर्तीकार नथ्थु डुकरे यानी ६० किलोची नंदी ची मुर्ती तयार करुन वणीतील भाविकांना सोबत घेऊन मध्य प्रदेश येथील नंदीगढा वर त्या मुर्ती ची स्थापना करुन एक प्रकारचा इतिहास वणी तील या भाविकांनी रचला.
या भाविकांनी नंदी च्या मुर्तीला जमीनी पासुन जवळपास ७० ते ८० हजार फुट उंच वर चढवली, चढवत असतांना आपल्या जिवाची पर्वा न करता हे महादेवाच्या भक्तानी वणी चा नावाची नोंद इतिहासात रचली.
प्रसिद्ध मूर्तीकार नथ्थु डुकरे यांनी आपल्या आई वडीलांच्या स्व. लटारी संभाजी डुकरे व गंगुबाई लटारी डुकरे यांचा स्मृतिप्रीत्यर्थ नंदीच्या मुर्ती ची स्थापना केली, त्यांचाबरोबर त्यांचे सहकारी संदीप धांडे, दत्ता गुरनुले, राहुल उपाते, आकाश उपाते, उमेश मोहुर्ले, अमित चौधरी, पियुष खामणकर, रवी राळे, सुयोग भेडांळे, गौरव मडावी, गुणवंत गोलर, अनिकेत सोनटक्के, प्रवीण खामणकर, विठ्ठल डुकरे व त्याचे इतर सहकारी सोबत होते.
सत्कारमुर्ती नथ्थु डुकरे यानी सांगीतले की या मूर्तीची स्थापना करा साठी त्याना कीती कष्ट करावे लागले, ४०० वर्षा नंतर नंदीगढा वर ही मुर्ती स्थापन झाली, त्याचा सर्व सहकारी मित्राच्या सोबती मुळे व माऊली च्या आशीर्वादाने मुर्ती ची स्थापना झाली. त्यांचा या कार्यामुळे वणी चा नावाची नोंद मध्यप्रदेश मधील नंदीगढा वर करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी या भाविकांची केलेल्या कार्याची दखल घेऊन आपल्या टिम ला सोबत घेऊन वणी येथील महालक्षी मंदिरात भाविकांचा सत्कार केला.
यावेळेस त्यांचासोबत युवक जिल्हा उपाध्यक्ष धीरज कुचनकर, महेश पिदुरकर, राजुभाऊ डावे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे,शहराध्यक्ष मनोज वाकटी,उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य,विद्यार्थीचे तालुकाध्यक्ष प्रणय बल्की व शहराध्यक्ष संदेश तिखट, अमोल चामाटे, मुकेश कडु आदी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महादेवाला जाऊन ६० किलो वजनाचा नंदीची मुर्ती नंदीगढा वर स्थापन करुन वणीतील भाविकांनी रचला इतिहास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 07, 2022
Rating:
