ब्रिटिश कालीन मैलकुली नामशेष; झरी जामणी तालुक्यात एकही मैलकुली नाही


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : ब्रिटिश सरकारच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सार्वजनिक रस्त्यांची देखभाल करण्याकरिता मैलकुलीची या पदाची निर्मिती केली गेली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या पदाची भरतीच बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात व तालुक्यात विविध रस्त्यांच्या डागडुजीचे काम मैलकुली करीत होते. तुटपुंज्या पगारावर काम करीत असलेल्या मैलकुली आता काळाच्या ओघात नामशेष झाल्यागत आहे. 

एकेकाळी तालुक्यातील विविध सार्वजनिक रस्त्यावर काम करणारे पंधरा मैलकुली होते. त्या मैलकुली चा एक प्रमुख असायचा त्याला "मेट" असे म्हणत होते. हा मेट मैलकुली कडून डागडुजी व रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडे झुडुप कटाईची कामे करून घेत होता. आता झरी जामणी तालुक्यात एक ही मैलकुली नाही. पूर्वी हे मैलकुली विविध संकटांना सामोरे जात इमानेइतबारे रस्त्यांची देखभाल करीत होते. त्या काळात केवळ तीन ते चार हजार रुपये पगारावर नोकरी करीत रस्त्याची डागडुजी करत होते.

कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या डागडुजीची कामे

हल्लीच्या काळात रस्त्यांच्या डागडुजीचे काम कंत्राटदारामार्फत करण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेने पद भरणे बंद केले. त्याकाळी मैलकुलींना केवळ तीन ते चार हजार मानधन मिळत होते. तुटपुंज्या पगारात मैलकुली रस्त्याची डागडुजी करीत होते. त्याचप्रमाणे रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडे झुडपे तोडून रस्ता सुव्यवस्थित करीत होते. आता मात्र ग्रामीण भागाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी होत नाही. परिणामी रस्ते खड्डेमय झाले आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत शहरी भागाला लागून असलेल्या गावांना शहराला रस्त्याच्या मार्फत जोडण्यात आले. सर्व गावांना रस्ते देण्यात आली. डांबरीकरण करण्यात आलेली रस्ते आता मात्र खड्डेमय झाले आहेत. मैलकुलींची संख्या कमी असल्यामुळे रस्त्याची डागडुजी करण्याकरता प्रशासनाला देखील वेळ नाही. जनतेची मागणी असेल तरच प्रशासनाला जाग येते अन्यथा प्रशासन झोपेत असल्याचे चित्र सध्यास्थितीत दिसून येत आहे.

तुटपुंज्या पगारातही केले काम 

१९९० ते २००० या काळात मैलकुली म्हणून तुटपुंज्या पगारात कामे केली. मला केवळ सुरुवातीला एक हजार दोनशे रुपये मानधन मिळत होते. दहा वर्षापूर्वी २०१३ मध्ये सेवानिवृत्त पूर्वी वेळेस मला सोळा हजार रुपये मिळायचे. आमच्या कालावधीत रस्त्याची डागडुजी मोठ्या प्रमाणात  होत होती. आता मात्र, कंत्राटदारामार्फत रस्त्यांची डागडुजी केली जाते. इमानदारीने सेवा देत निवृत झालो आहे.

-गोविंदा गोवारदिपे
सेवानिवृत्त मैलकुली,मुकूटबन.


ब्रिटिश कालीन मैलकुली नामशेष; झरी जामणी तालुक्यात एकही मैलकुली नाही ब्रिटिश कालीन मैलकुली नामशेष; झरी जामणी तालुक्यात एकही मैलकुली नाही Reviewed by सह्याद्री चौफेर on March 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.