लालपुलीयातील कोळसा डेपो हटवा, चिखलगाव वाचवा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात अनधिकृत थाटलेल्या कोळशाच्या डेपोतून निघणाऱ्या धुळीचा भस्मासुर येथील ग्रामस्थांच्या जीवावर बेतला आहे. परिणामी अनेकांना दुर्घर आजाराने ग्रासले आहे. सदर अनाधिकृत कोळसा डेपो तात्काळ न हटविल्यास येत्या १४ मार्च ला सर्व नागरिकांना सोबत घेऊन कोळशाचे वाहन  परिसरात येऊ देणार नाही असा ईशारा राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात अनधिकृत कोळसा डेपो थाटले आहेत. या कोळसा डेपोतून निघणाऱ्या घुळीने चिखलगाव येथील सर्व नागरिकांना  दमा किडनीचे आजार, हृदयविकार, अनेक असे दुर्धर आजार जडले आहेत .लालपुलिया येथील कोळसा डेपोधारक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे कोणतेही पालन करीत नाही .परिणामी धुळीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.

घरात धुळीचा खच पडलेला आहे . या गावातील सर्वच धुळ प्रदूषणाने ग्रासलेले आहे, रुग्ण मोलमजुरी करून जगणारे आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर रुग्णांना महसूल प्रशासन सेवा पुरविणार की डेपोधारक पुरविणार याचा खुलासा उपविभागीय अधिकारी यांनी करावा. धुळीने ग्रासलेल्या लोकांना सुविधा पुरवून त्यांच्या जीवित्वाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. अन्यथा चिखलगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आणणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
लालपुलिया परिसरात असलेले अनधिकृत कोळसा डेपो येत्या सात दिवसात न हटविल्यास १४ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लालपुलिया परिसरात आंदोलन उभारून डेपोत कोळशाचे एकही वाहन येऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष धीरज कुचनकर, राजु दावे, कर्मा तेलंग, वैशाली तायडे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, विद्यार्थी चे तालुकाध्यक्ष प्रणय बलकी, शहराध्यक्ष संदेश तिखट, चिखलगाव चे ग्रा.प.सदस्य अजुंम शेख, संगीता वानखेडे, सुनीता कातकडे, वैशाली लिहीतकर, रियाज शेख आदींनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

यावेळी पोलीस विभागातील गोपनीय विभागातील कर्मचारी हजर होते.
लालपुलीयातील कोळसा डेपो हटवा, चिखलगाव वाचवा लालपुलीयातील कोळसा डेपो हटवा, चिखलगाव वाचवा Reviewed by सह्याद्री चौफेर on March 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.