भुमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसेचे बेमुदत उपोषण आरंभ !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी उद्योगांमध्ये तसेच वेकोली अंतर्गत खासगी कंपन्यामध्ये स्थानिक भुमिपुत्र बेरोजगार युवकांना कामावर घेण्यात यावे तसेच रोजगारांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबीत करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी मनसे व स्थानिक गावकरी मंडळी व महिलांनी आज साेमवार दि.७ मार्च पासुन स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले आहे.

औद्योगीक जिल्हा असुनही उद्योग व मोठ मोठ्या कंपनीत स्थानिकांना रोजगार दिला जात नाही.ही वस्तु स्थिती आहे. जिल्ह्यातील युवकांना पुणे, मुंबईला नाईलाजाने जावे लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात सन २०१० पासुन उद्योगात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी वेळोवेळी आंदोलन केले आहे. एका आंदोलनात मनसेचे नेते मनदीप रोडेंसह तब्बल ४० कार्यकर्त्यांनी जवळपास साडेतीन महीने काराग्रूहात कारावास देखील भोगला आहे. स्थानिक भुमिपुत्रांच्या हक्कासाठी मनसे नेहमीच संघर्ष करीत असले तरी कंपनी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीं सोबत मिलीभगत करून स्थानिकांना डावलुन पर प्रांतीयांना नाेकरीवर ठेवित आहे. यामुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये असंतोषाताचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते .नाेकरी अभावी येथील तरूण युवक व्यसन व गुन्हेगारीकडे वळले आहे. स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर प्रशासन व पोलीस खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या अडचणीत अधिक भर टाकीत आहे. यामुळे शेवटी त्रस्त होऊन मनसे व बेरोजगारांनी बेमुदत उपोषणाला आज पासून आरंभ केला आहे. आता रोजगारासाठी करो या मरो अशी भुमिका मनसेनो घेतली आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अश्या १ जिल्ह्यातील खासगी उद्योग व कंपनी तसेच वेकोली अंतर्गत खासगी कंपनी स्थानिक बेरोजगारांना नाेकरी देण्यात यावी. २. रोजगार मागण्यांसाठी आंदोलन करणांऱ्या मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी व महिलांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे. आदीं मागण्या येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातुन केल्या आहे. सदरहु आंदोलन मनसचेे नेते मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात सुरु झाले असून आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी बेमुदत उपोषणाला अमा पिंपळशेंडे, मंगेश तुमसरे, पंढरी तुमसरे सर्व (राह. मार्डा,) आकाश डोंगरे, महारत्न लोहकरे (राह. एकोना) बसले आहे.

उपरोक्त आंदोलनाला स्थानिक बेरोजगार युवकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असुन उपोषण मंडपात आज मनदिप रोडेंसह मनसचेे सुमित करपे, बाबा चंदलवार, नवाज शेख स्वाभी राऊत, राकेश हनुमंते राहुल मडावी, संदिप अरडे, मिथुन महाकुलकर, रोशन बलकी, आकाश काकडे, अज्जु पठाण, अजय दासर, अजय रेवेल्ली, विक्की हत्तीमारे, वैभव चवले, स्वप्नील भडके, वैशिष्ट देटे, प्रेमकुमार गुगल, शुभम बोथलें, महादेव भोयर, अनिकेत उथाणे, छगण हिरदिवे, राहुल तुमसरे, प्रविण तुराणकर, राजेंद्र तुमसरे, वैभव लांबट आदीं कार्यकर्ते व बेरोजगार उपस्थित होते.
भुमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसेचे बेमुदत उपोषण आरंभ ! भुमिपुत्रांच्या रोजगारासाठी मनसेचे बेमुदत उपोषण आरंभ ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.