यवतमाळ येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने कार्यकर्ता बैठक व सत्कार सोहळा संपन्न

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा मा महादेव जानकर  स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी, रासप चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मा काशीनाथ शेवते साहेब, मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य मा ज्ञानेश्वर सलगर, राष्ट्रीय संघटक मा गोविंद सुरनार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

आज विदर्भ दौर्यावर असताना यवतमाळ येथे चेतन भाऊ आगलावे यांच्या नेत्रुत्वात सन्मानित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा व पदाधिकारी मेळावा स्थानिक कसाळकर कॉम्लेक्स,सारस्वत चौक यवतमाळ येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा काशीनाथ शेवते साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाची आजच्या परिस्थितीत समाजाला असलेली गरज,मा महादेव जानकर साहेबांचे नेतृत्व यावर प्रकाश टाकला तर प्रमुख पाहुणे असलेले मुख्य महासचिव मा ज्ञानेश्वर सलगर साहेबांनी सध्याच्या राजकीय परिक्षेपात राष्ट्रीय समाज पक्षाचे वाढते महत्त्व तसेच केंद्र व राज्य सरकारच्या गोंधळात होणारा ओबीसी समाजावरील अन्याय यावर विचार प्रकट केले.

संघटन बांधनी व पक्षीय कार्य यावर मा गोविंद सुरणार यांचे मार्गदर्शन लाभले. यवतमाळ तसेच विदर्भात राष्ट्रीय समाज पक्ष पुढील काळात एक प्रमुख राजकीय ताकद म्हणून उदयास येईल असे मत प्रास्ताविक भाषणात चेतनभाऊ आगलावे यांनी मांडले.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ते, श्री टिंकू उर्फ सुरज मेश्राम यांना तालुका संघटक यवतमाळ पदावर नियुक्ती करण्यात आली. आभार प्रदर्शन श्री अंकुश मस्के जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी यांनी केले.

सदर कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती विदर्भ अध्यक्ष (पूर्व विभाग) चेतन आगलावे यांनी दिली.

यवतमाळ येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने कार्यकर्ता बैठक व सत्कार सोहळा संपन्न यवतमाळ येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने कार्यकर्ता बैठक व सत्कार सोहळा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on March 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.