हटवांजरी पोड येथील रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील हटवांजरी पोड येथील हा रस्ता डांबरी करणाकरीता मंजूर झाला असून रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

सदर रस्ता हा हटवांजरी पोड येथील 25 ते 30 कुटुंब वास्तव्य करीत असलेल्या आदिवासी वस्तीकडे जाणारा असून ह्या रस्त्यावर गैरअर्जदार जाणून-बुजून आदिवासी पोडाच्या विकास होऊ नये या दृष्ट हेतूने अडवणूक अडथळा निर्माण करीत आहे.

त्याबाबत गावकऱ्यांनी तहसील कार्यालय तथा वेगवेगळ्या महसुली विभागात तसेच आमदार 
साहेब यांना निवेदने देऊन गैरअर्जदार यांचा अडथळा दूर करून रोडचे काम व्हावे अशी विनंती केली.

परंतु संबंधित अधिकारी यांच्या कडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे गैरअर्जदार हे मुजोर होऊन वागत आहे गैरअर्जदाराने वेळ काढून घेण्या करिता शेतीची मोजणी केल्यावर रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचे सांगितले. परंतु दि .08/03/22 रोजी मोजणी होऊन सुध्दा गैरअर्जदाराणे अडथळा दूर केला नाही किंवा प्रशासना कडून गैरअर्जदार यांचेवर कार्यवाही झाली नाही. हटवांजरी पोड रस्त्याचे बाबतीत आम्ही वारंवार निवेदन तक्रारी माध्यमातून जाहिराती देऊन व वारंवार पाठपुरावा करून त्रस्त झालो आहो,परंतु आमच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे आम्ही गावकरी येत्या दि .14/03/22 पर्यंत गैरअर्जदार यांचेवर कठोर कार्यवाही होऊन रोडचे काम सुरू न केल्यास आम्ही दि .17 /03/22 रोजी वेळ दु 12.00 वा वणी यवतमाळ रोडवर बुरांडा स्टॉपवर चक्का जाम आंदोलन करणार व याची सर्वंस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.

यावेळी राजू पारखी, परशराम ठक, लक्ष्मण आस्वले, संतोष टेकाम, सुरेश आत्राम, प्रमोद मेश्राम आदी गावकरी उपस्थित होते.
हटवांजरी पोड येथील रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात हटवांजरी पोड येथील रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात Reviewed by सह्याद्री चौफेर on March 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.