सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : आपल्या शहराचे हरहुन्नरी कलावंत, व्यावसायिक, असणारे येत्या निवडणुकीत नव्या भूमिकेत दिसणार यात शंका नाही, मात्र त्याची पूर्व तयारी त्यांनी नाटकाद्वारे सुरू केली आहे अस म्हणायला हरकत नाही.
वणीच्या नाट्यकलेला पुन्हा संजीवनी देणारे व शहरात विविध नाट्य निर्मिती करणारे सागर मुने हे नागपूर येथे सुरू असलेल्या ६० व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत "राजकारण" या दोन अंकी नाटकात अभिनय सादर करणार आहे. आज प्रभास बहुद्देशीय ट्रस्ट निर्मित राजकारण हे नाटक सायंकाळी 5 वाजता सुरू होत आहे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक रविंद्र नारायण गुजर यांनी केले आहे.
या नाटकात राजकारण हा वेगळ्या पद्धतीने विषय मांडणी लेखकाने केली आहे. अतिशय गंभीर, गुप्त, शरीरावर काटे येतील असे कथानक, असल्याने पाहताना प्रत्येक वेळेस काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असणार आहे. सर्व कलावंत दमदार अभिनय सादर करतील यात शंका नाही.
यात प्रणाली ईश्वर भोसकर, दिलीप हरकरे, मिलिंद शेट्टे, कार्तिक काकडे, सागर मुने, प्रशांत ढोके, ज्ञानेश्वर नाडेकर, रौनक तायवाडे, जय कोचे, गीता, डॉ विजया, गावातील बाई, मनोज इंगोले, वैष्णवी ढाबरे, विलास राऊत, सुभाष मांडवकर आणि पुढारी माणूस (दुहेरी भूमिकेत) महेश वांगे, पंकज, सोहम भोसकर, लाजरि काळे, साक्षी गुमगावकर, शताब्दी सहारे, नीलम हे सर्व कलावंत अभिनयाद्वारे आज राजकारण नाटक रंगवणार आहे.
नागपूर येथे सागर मुनेचे राजकारण !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 10, 2022
Rating:
