सह्याद्री न्यूज | बालाजी सुवर्णकार
उदगीर : येथील शरद तेलगाने हे गेले अनेक वर्षापासून उदगीर येथे सामाजिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या अनेक गेल्या वर्षांपासूनची त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन त्यांना या वर्षीचा बारा बलुतेदार बहुद्देशिय सेवाभावी संस्था उदगीर जिल्हा लातूर च्या वतीने दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर उदगीर येथील लोकमतचे वरिष्ठ पत्रकार व्ही एस कुलकर्णी, साप्ताहिक ज्ञानांकुंश चे औसा येथील मुख्य संपादक वामन अंकुश, संस्थेचे पदाधिकारी प्रा. शशिकांत जाधव, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला बिरादार, राष्ट्रीय काँग्रेस चे उदगीर विधान सभांचे पदाधिकारी अमोल घुमाडे, संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे सचिव तथा शिक्षक बालाजी सुवर्णकार, सेवानिवृत्त शिक्षक नारायण घटकार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी बारा बलुतेदार बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी संजय पांचाळ, श्रीमंत शेळकीकर, सेवानिवृत्त प्रा.नरेंद्र कठारे, बळीराम पाटील विद्यालय औरंगाबादचे मुख्याध्यापक, मुक्तेश्वर श्रीमंगले यांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बालाजी सुवर्णकार यांनी केले.
डॉ शरद तेलगाने यांना बलुतेदार भूषण पुरस्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 10, 2022
Rating:
