चंद्रपूर मनपा नगर सेवक नंदू नागरकरांवर प्राणघातक हल्ला !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शहर काँग्रेस कमेटीचे भूतपूर्व अध्यक्ष तथा चंद्रपूर मनपाचे विद्यमान नगर सेवक नंदु नागरकर यांच्यावर आज शुक्रवारी भल्या सकाळी चंद्रपूरच्या मुख्य मार्गावर प्राणघातक हल्ला झाला. त्या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत आली असुन सध्या त्यांचेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान शहरातील सामाजिक यंग चांदा ब्रिगेडने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तदवतचं सदरहु मागणीचे एक लेखी निवेदन त्यांच्या वतीने चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, घूग्घूस शहर संघटक विलास वनकर, शहर संघटक करणसिंह बैस, शहर संघटक रुपेश पांडे, शहर संघटक राम जंगम आदींची उपस्थिती होती.  
सकाळी मॉर्निंग वॉक वरुन घराकडे परत येत असतांना आजाद बागेजवळ दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकांनी काँग्रेसचे नगर सेवक नंदू नागरकर यांच्यावर क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला केला. यात नंदु नागरकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे. या घटनेचे आता जिल्हाभर तिव्र पडसाद उमटत असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी शहरात जोर धरु लागली आहे.
चंद्रपूर मनपा नगर सेवक नंदू नागरकरांवर प्राणघातक हल्ला ! चंद्रपूर मनपा नगर सेवक नंदू नागरकरांवर प्राणघातक हल्ला ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.