'त्या' निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा - वनोजा (देवी) येथील गावकऱ्यांची मागणी


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : तालुक्यातील वनोजा येथील गावाकऱ्यांनी निकृष्ट बांधण्यात आलेला रस्ता व साचलेली घाण,कचरा,सांडपाणी यापासून निर्माण झालेली दुर्गंधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या संदर्भात मारेगाव गटविकास अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील वनोजा येथे चौदा वित्त आयोगातून गावात काँक्रीट रोड चे बांधकाम करण्यात आले, मात्र या कामामुळे गावकरी समाधानी नसून सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचे येथील नागरिकांनी तक्रारीत नमूद केले आहे. हनुमान मंदिर ते गाडगे यांच्या घरा जवळ गावातील सांडपाणी साचले असून त्यापासून दुर्गंधी पसरून आम्हा गावाकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ निकृष्ट रस्त्याच्या बांधकामाची चौकशी येत्या आठ दिवसात करावी, अन्यथा आम्ही गावकरी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी प्रशांत भंडारी, रोशन शिंदे, कृष्णा पुनवटकर, सौ प्रेमीला गाडगे, जगन्नाथ पुनवटकर, सौ प्रेमीला ब. गाडगे, सौ मीना गाडगे, सौ रिता गाडगे आदी उपस्थित होते. 
'त्या' निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा - वनोजा (देवी) येथील गावकऱ्यांची मागणी 'त्या' निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा - वनोजा (देवी) येथील गावकऱ्यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on March 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.