कोळसा वाहतूक करणारा ट्रेलर उलटून एकाचा मृत्यु

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कोळसा वाहतूक करणारा ट्रेलर उलटून झालेल्या अपघातात ट्रॅकमध्ये बसलेला युवक मरण पावल्याची घटना वणी रोडवरिल संविधान चौकाच्या वळण रस्त्यावर काल रात्री उशिरा घडली. ट्रक चालक मात्र सुखरुप असल्याचे समजते.

उकणी कोळसाखाणीतून साई वर्धा पॉवर प्लान्ट येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक MH 40 BG 4283 हा संविधांन चौकातील वळण रस्त्यावर उलटला. वळण घेतांना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यने हा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे. ट्रक चालक विनोद गौरकर हा सुखरुप असुन ट्रकमध्ये बसलेला सुरज ठाकुर हा युवक ग्रामीण रुग्णालयात आणताना मरण पावल्याची चर्चा आहे. हा युवक ट्रान्स्पोर्ट कंपनीत कार्यरत नसतांना ट्रकमध्ये कशासाठी गेला ही चर्चा ऐकायला मिळत आहे. सुरज ठाकुर याचे लग्न होऊन जेमतेम 25 दिवस झाले होते. त्याचे असे अपघाती निधन झाल्याने कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सुखी संसाराचे स्प्वप्न रंगविलेल्या नववधूचे तो अर्ध्यावर संसार सोडून गेल्याने स्वप्न भंगले आहे. त्याच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
कोळसा वाहतूक करणारा ट्रेलर उलटून एकाचा मृत्यु कोळसा वाहतूक करणारा ट्रेलर उलटून एकाचा मृत्यु Reviewed by सह्याद्री चौफेर on March 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.