सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील काेरपना हा तालुका. ह्या तालुक्याची निर्मिती होऊन आज बरीच वर्षे झाली. मात्र या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचण सहन करावी लागत आहे. याच तालुका ठिकाणी शासकीय-निमशासकीय कामासाठी तदवतंच बाजाराकरिता अनेक ग्रामीण भागातील हजाराें लाेक ये-जा करीत असतात. काेणत्याही शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे फारच आवश्यक झाले आहे. परंतु कोरपना तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँका नसल्याने या तालुक्यातील जनतेला शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा कोरपना शहरांमध्ये राष्ट्रीयीकृत बँक देण्यात यावेत अशी मागणी कोरपना येथील प्रहार संघटनेचे अफरोज अल्ली व अन्य प्रहार सेवकांनी काेरपन्याचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना एका निवेदनातुन नुकतीच केली आहे मागणीची पुर्तता न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखिल सादर केलेल्या निवेदनातुन प्रहार सेवकांनी दिला आहे.
कोरपना येथे राष्ट्रीयकृत बँक द्या ! प्रहारची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 04, 2022
Rating:
