सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : येथे आज विश्राम गृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन विद्यार्थ्यांना नियुक्तपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. विद्यार्थी चळवळीत काम करणा-या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे यांनी हि नियुक्ती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
ना जयवंतराव पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, सुनील गव्हाणे व पश्चिम विदर्भ अध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या आदेशानुसार वणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रणय बलकी तर शहर अध्यक्षपदी संदेश तिखट यांची नियुक्ती करण्यात आली.
वणी विभागा मध्ये लढा शिक्षणाचा विद्यार्थीच्या हक्काचा या चळवळीतील स्वप्नील धुर्वे यांच्या सातत्याने सोबत असणारे हे विद्यार्थी आज महत्वाचा पदावर नियुक्त झाले आहे.
विद्यार्थीची चळवळ उभी करुन त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांच्या प्रवेशा करीता यात संघटनेच्या प्रत्येक व्यक्तीचा खुप मोठा लढा वणीकराना अनुभवला आहे, चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांचा नियुक्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी पक्षाचे जेष्ठ नेते विजय नगराळे, महेश पिदुरकर,कर्मा तेलंग, जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, तालुकाध्यक्ष सुर्यकांत खाडे, युवक उपाध्यक्ष धीरज कुचनकर, युवक तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, युवक शहराध्यक्ष मनोज वाकटी, राजु उपरकार, राजुभाऊ डावे, रामकृष्ण वैद्य, वैशाली तायडे व विद्यार्थी वर्ग उपस्थित पती व त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या नियुक्ती मुळे वणी विभागात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
लढा शिक्षणाचा विद्यार्थीच्या हक्का चा चळवळीतील कार्यकर्त्यांना पद देऊन केला त्यांचा सन्मान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 04, 2022
Rating:
