शिक्षक नेते,सत्कार मुर्ती मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार!


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : तालुक्यातील जि.प.शाळा मोहोर्ली येथे कार्यरत असलेले,मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा आज (ता.४) मार्च शुक्रवारला निरोप समारंभ संपन्न झाला.

"ज्ञान रुपी समुद्रातील देवमासा म्हणजेच शिक्षक "त्यांच्या हातुन हजारो विद्यार्थी घडुण,समाजामध्ये आपले योगदान देत असतात,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत सर्वांत मोठा दुआ म्हणजेच शिक्षक असे मत बोलतांनी मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहुर्ली येथील सरपंच दिपमाला वडसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.कविता टेकाम, धनराज टेकाम उपसरपंच-छाया मडावी, ज्योती टेकाम, कवडू वडसकर, सुधीर गौरकार ग्रामपंचायत सदस्य, केंद्र प्रमुख नामदेव बोबडे, केंद्र मुख्याध्यापक मारोती उपरे, शाळा समिती सदस्य पुष्पा राजुरकर, संगीता टिकले, गंगुबाई टेकाम, संगीता जाधव, प्रमोद कन्नाके, मंगेश आत्राम, अरविंद राजुरकर, राकेश दुबे,यांचे उपस्थिती होती. यावेळी मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला. तसेच चिखलगाव केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वतीने मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. जि.प.शाळा मोहोर्लीच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते.

यावेळी मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी जि. प.शाळा मोहोर्ली येथे तांत्रिक साहित्या करीता रू ५०००/- रु.चा धनादेश मुख्याध्यापिका सौ.लक्ष्मी धुर्वे यांचे कडे देणगी स्वरूपात देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.लक्ष्मी धुर्वे यांनी केले. तर सुत्र संचालन शिक्षक राजेंद्र आसुटकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी उत्तरवार, कु.कोयल जिवतोडे (शिक्षिका) तंटामुक्त अध्यक्ष शंकरराव टेकाम, संजय उरकुडे, माजी अध्यक्ष प्रमोद टेकाम, सदस्य शंकरराव बोढाले, धिरज तायडे यांनी परिश्रम घेतले. कु.राखी चौधरी यांनी मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी चिखलगाव केंद्रातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, स.शिक्षक, शिक्षिका व मोहोर्ली गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
शिक्षक नेते,सत्कार मुर्ती मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार! शिक्षक नेते,सत्कार मुर्ती मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.