टॉप बातम्या

हरहर महादेव ग्रुप च्या वतीने पाचपावली साजरी

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : नरसाळा येथील हर हर महादेव ग्रुप च्या वतीने तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पांढरदेवी येथे स्नेह भोजन सोहळा संपन्न झाला. सध्या महाशिवरात्री पर्व सुरु असल्याने भोल्या च्या दर्शनासाठी विदर्भातील दुरुदुरून भक्त चौऱ्यागड येथे जातात, अशातच नरसाळा येथील हरहर महादेव ग्रुप चे सर्व सदस्य चौऱ्यागड चे दर्शन घेऊन गावी परतले. त्या अनुषंगाने ग्रुपच्या वतीने पाच पाऊली सोहळा पंढरदेवी येथे साजरा करण्यात आला.

या वेळी हर हर महादेव ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण कनाके व उपाध्यक्ष नाना दडांजे तसेच सदस्य आकाश नक्षीने, मारोती तोडासे, सतीश मरस्कोले, गजानन नेहारे, आशिष रामटेके, भाविक कोयचाडे, नितेश मेश्राम, महेश राऊत, देवा बोढे, विलास तोडासे, पवन बोढे, संजय नक्षिने विलास राजगडकर, महेंद्र उईके, निरंजन तिकट, निलेश बोढे, अमोल नेहारे आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post