चिमूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ तारखेला चक्काजाम आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : ओबीसी जातनिहाय जनगणना करा,ओबीसींचे स्थानिक स्वराज संस्थेतील गेलेले राजकीय आरक्षण द्या,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करा, विद्यार्थ्यांना १०० % ओबीसी स्कॉलरशिप देण्यांत यावी, दोन वर्षापासून पूर्व मॅट्रिक स्कॉलरशिप मिळत नाही ती द्यावी,ओबीसी शेतकऱ्यांना विविध योजना सुरू कराव्या वन पट्ट्यासाठी तीन पिढ्याची अट रद्द करावी, व वर्ग ३ व ४ ची नोकर भरती तातडीने सुरू करावी आदीं मागण्यासाठी सोमवार दि.७ मार्चला दुपारी १ वाजता चिमूर तहसिल कार्यालय समोर चक्का जामआंदोलन  करण्यात येणार आहे.

सदरहु आंदोलनाचे आयाेजन राष्ट्रीय आेबीसी महासंघ, राष्ट्रीय आेबीसी युवा संघ व राष्ट्रीय आेबीसी महिला संघ यांच्या संयुक्तिक विद्यमाने करण्यांत आले असल्याचे आयाेजकांनी एका पत्रकातुन आज कळविले आहे.
चिमूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ तारखेला चक्काजाम आंदोलन चिमूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ तारखेला चक्काजाम आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on March 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.