रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक काेतवाल बांधव मुंबई संपात उतरणार !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शासन दरबारी गेल्या कित्येक वर्षापासून काेतवाल बांधवाच्या मागण्या खितपत पडल्या आहे. या कडे शासनाने अद्याप लक्ष वेधले नाही. या रास्त व प्रलंबित न्याय मागण्या पदरात पाडुन घेण्यासाठी येत्या ७ मार्च राेजी मुंबईत महाराष्ट्र राज्य काेतवाल संघटनेव्दारा बेमुदत आंदोलन पुकारण्यात येत आहे.  

या आंदाेलनात सहभागी हाेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काेतवाल बांधव माेठ्या संख्येने मुंबईला पाेहचत असल्याची माहिती काल चंद्रपूर मुक्कामी चंद्रपूर काेतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश नांदे, सचिव संदीप थाटे, सहसचिव शंकर निंदेकर, व कोषाध्यक्ष भाेजराज चौधरी यांनी एका भेटी दरम्यान आमच्या प्रतिनिधीस दिली. दरम्यान निलेश नांदे यांचेसह अन्य अकरा काेतवाल बांधवांनी चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड यांची शुक्रवारी भेट घेवून त्यांना मागण्यांचे एक निवेदन सादर केले. तदवतचं संपूर्ण काेतवाल बांधवाना मुख्यालय साेडण्यांची परवानगी देण्यांत यावी या आशयाचे एक पत्र सुध्दा दिले असल्याचे समजते. तुटपुंज्या मानधनात काेतवाल बंधु गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक पणे काम करीत आहे. वाढत्या महागाईच्या काळात एवढ्या अल्प मानधनात आपल्या कुटुंबांचा उदार निर्वाह कसा चालवावा हा प्रश्न नेहमीच त्यांच्या डाेळ्यां समाेर उभा असताे. परंतु शासनाने या कर्मचा-यांकडे कधीच सहानभूतिने व आपुलकीने लक्ष पुरविले नाही हे खरे वास्तव आहे.

तलाठ्यांसाेबत दिवस रात्र व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणां-या या कोतवाल बांधवानी वेळाेवेळी काेतवाल संघटनेच्या माध्यमांतुन प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी केला परंतु ख-या अर्थाने त्यांना मिळाला नाही. त्यामुळेच काेतवाल संघटनेने आता बेमुदत आंदाेलनाचे पाऊल उचलले आहे. 
रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक काेतवाल बांधव मुंबई संपात उतरणार ! रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक काेतवाल बांधव मुंबई संपात उतरणार ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.