युवतीचे लैंगिक शोषण, २७ वर्षीय आरोपीस केली अटक


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : लग्नाचे आमिष दाखवून सतत चार वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका २७ वर्षीय आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला आज रोजी अटक केली. 

तालुक्यातील खेकडवाई येथील २५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विलास मनोहर रामपुरे (२७) याने त्याच गावात राहणाऱ्या युवतीचे गेल्या चार वर्षाच्या कालावधीत लैंगिक शोषण केले. यासंदर्भात पीडितेने गुरुवार दि.३ मार्च रोजी मारेगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून, दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विलास रामपुरे विरुद्ध लैंगिक शोषण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व मारेगाव ठाणेदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे.
युवतीचे लैंगिक शोषण, २७ वर्षीय आरोपीस केली अटक युवतीचे लैंगिक शोषण, २७ वर्षीय आरोपीस केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on March 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.