सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
रेती घाटांचे लिलाव करून अधिकृत रॉयल्टी देण्यात आली असतांनाही अधिक नफा कमविण्याच्या नादात वाळू माफिया रेती वाहतुकीत गैर प्रकार करीत आहे. दोन ब्रासची रॉयल्टी घेऊन पाच ते सहा ब्रास रेती ट्रकांमध्ये भरून सर्रास विक्रीकरिता आणली जात आहे. वाळू माफियांकडून शासनाची शुद्ध फसवणूक सुरु असून रॉयल्टीच्या आडून शासनाच्या महसुलावर डल्ला मारण्याचे प्रकार सुरू आहे. दोन ब्रासच्या परवान्यावर पाच ते सहा ब्रास रेती वाहनांमध्ये भरून विक्री केली जात आहे. रेतीच्या या चोरट्या व्यवहारातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. घाटांमधील रेती अक्षरशः ओरबाडून टाकण्याचा घाटमालकांचा प्रयत्न सुरु आहे. दोन ब्रास रेतीचा परवाना असतांना जास्त रेती भरून आणणाऱ्या MH २९ BE २६१६ व MH ३४ BE ४९७५ या दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही करून ट्रक तहसील कार्यालयासमोर लावले आहेत. अधिकृत रॉयल्टीचा वाळू माफियांकडून गैरफायदा घेतला जात आहे. दोन ब्रास ऐवजी वाहनामध्ये पाच ते सहा ब्रास रेती भरून विक्री केली जात आहे. यातून वाळू माफियांना चांगलाच आर्थिक लाभ मिळत आहे. MH २९ BE २६१६ या ट्रक चालका जवळ गडचिरोली जिल्ह्याची रॉयल्टी असून ट्रकमध्ये दोन ब्रास पेक्षा जास्त रेती असल्याचे महसूल विभाकडून सांगण्यात आले आहे. हा ट्रक संजय जुनगरी याच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही ट्रकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असून दंड भरल्यानंतर हे दोन्ही ट्रक सोडण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ओव्हरलोड रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक महसूल विभागाने पकडले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 03, 2022
Rating:
