टॉप बातम्या

निवेदनाने नाही जमले,रुग्णसेवक उपोषणाला बसले

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
 
जिवती : मागील बऱ्याच दिवसापासून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी रुग्णसेवक जिवन तोगरे यांचे कडून वारंवार पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर तहसील कार्यालयासमोर उपोषण धरून बसले आहेत.

बऱ्याच वेळा निवेदन दिले तरी निवेदनाला प्रतिसाद न देणे ही परंपरा तालुक्यासाठी काही नवीन नाही.तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांची नेमणूक करावी,तालुक्यात सुरू असलेले कामे लवकर व गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजे,तहसील कार्यालयासमोर असलेली आरो मशीन ही शोभेची वस्तू झाली असून ती त्वरित सुरू करावी. कारण उन्हाळा सुरू झाला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तहसील कार्यालयात सुरू असलेला सावळा गोंधळ बंद करून जनतेला दलाल व अतिरिक्त पैसे घेऊन काम करणाऱ्या कर्मचारी यावर अंकुश लावला जावा. कुंभेझरी येथे त्वरित डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावे.

अशा अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी उपोषण मांडले आहे. जर प्रशासन या कडे लक्ष देत नसेल तर आमरण उपोषणाचा मार्ग काढू असा इशारा रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिला आहे. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Previous Post Next Post