रवि घुमे | सह्याद्री चौफेर
यवतमाळ : चंद्रपुरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कवियित्री प्रा.विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी आज (ता.26) 'विमल दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता कार्यक्रम ठरला आहे. अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यिक व संपादक सुरेश द्वादशीवार तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, समीक्षक डॉ.प्रतिभा वाघमारे उपस्थित राहतील.
यावेळी शाम पेठकर संपादित प्रा.विमल गाडेकर लिखीत अप्रकाशित साहित्य "कोवळेकंच" या पुस्तकाचे तसेच अविनाश पोईनकर व वर्षा पोईनकर संपादित प्रा.विमल गाडेकर व्यक्ती आणि वाङमय या ग्रंथाचे प्रकाशन होईल. सोबतच प्रा.विमल गाडेकर लिखीत 'चंदनी दरवळ' या रमाईवरील खंडकाव्याचे साभिनय सादरीकरण अॅड.चैताली बोरकुटे कटलावार व सुशील सहारे करतील.
दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन अमरावतीचे प्रसिद्ध कवी बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेखाली व कवियित्री शोभा रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यात उषाकिरण आत्राम, पद्मरेखा धनकर, श्रीपाद जोशी, किशोर कवठे, मनोज बोबडे, रेवानंद मेश्राम सहभागी होतील. सुत्रसंचालन कवी पुनीत मातकर करतील.
इंजी.भगवान गाडेकर, डॉ.हेमन्त व सविता गाडेकर, जयंत व सोनामोनी गाडेकर, अर्चना व प्रकाश शंभरकर, डॉ.मोना पंकज तसेच प्रा.विमल गाडेकर स्मूती समीतीने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आज चंद्रपुरात "विमल दिवस"; कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 26, 2022
Rating:
