सुवर्णकार बालाजी | सह्याद्री चौफेर
उदगीर : प्राथमिक शाळा हे संस्काराचे केंद्र असून प्राथमिक शिक्षणाचा पाया हा मजबूत झाला तर यशाचे शिखर उंच नक्कीच गाठता येते यशाची उंच शिखर गाठण्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनत अहोरात्र मेहनत केल्यानंतर यश आपोआप प्राप्त होते माझा प्राथमिक शिक्षणाचा पाया श्री विश्वनाथराव चालवा प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मला चांगले संस्कार देऊन माझ्या यश्याच्या पायरित शाळेचा खूप मोठा वाटा असून प्राथमिक शाळेने केलेला सन्मान हा खूप मोठा सन्मान आहे असे गौरवोद्गार डॉक्टर महेश गायकवाड यांनी काढले श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या वेळी विचारपीठावर शाळेचे मुख्याध्यापक राजाराम भोसले व डॉक्टर महेश गायकवाड चे आई वडील उपस्थित होते डॉक्टर महेश गायकवाड पुढे म्हणाले की श्री विश्वनाथराव चालवा प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी योग्य संस्कार दिल्यामुळे व प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी संविधान संधिवात रोप शास्त्र ही पदवी प्राप्त झाल्याने भारत देशात 11 व्या क्रमांकाने मिळाल्याने त्यांनी सांगितले यावेळी डॉक्टर महेश गायकवाड यांनी प्राथमिक शाळेचे नाव लौकिक केल्याबद्दल त्यांचे व आई-वडिलांचा सन्मान शाल पुष्पहार व सन्मानपत्र देऊन करण्यात आला अध्यक्षीय समारोप प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनी डॉक्टर महेश गायकवाड यांची कौतुक करून संस्थेच्या शाळेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व डॉक्टर महेश गायकवाड यांचा आदर्श घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च पदावर जावीत असा सल्ला दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील सह शिक्षक बालाजी सुवर्णकार यांनी केले तर आभार प्रदर्शन नागणात सोमवंशी यांनी केले या सन्मान सोहळ्यात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक शाळेने केलेला सन्मान हा खूप मोठा सन्मान असतो. - डॉ.महेश गायकवाड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 19, 2022
Rating:
