लग्नात झालेल्या ओळखीतून त्याने लग्नाचेच आमिष दाखवून तरुणीचे केले शारीरिक शोषण

प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर 

वणी : लग्नाचे आमिष दाखवून मागील काही महिन्यांपासून महाविद्यालयीन तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाने मुलीला लग्न करण्याचा विश्वास दाखवत सातत्याने तिचे शारीरिक शोषण केले. परंतु नंतर मुलीने लग्न करण्याचा हट्टाहासच धरल्याने त्याने मुलीला टाळणे सुरु केले. त्यामुळे त्याचा शारीरिक संबंधाचाच हेतू असल्याचे मुलीला कळून चुकले. त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याकरिता लग्नाच्या भूलथापा दिल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने वडिलांसह पोलिस स्टेशनला येऊन तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील एका महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला असलेली २१ वर्षीय तरुणी तालुक्यातीलच एका गावात राहते. गावातील ओळखीतल्या मुलीचं लग्न असल्याने ती त्या लग्नाला गेली होती. त्याच लग्नात आरोपीची या तरुणी सोबत ओळख झाली. आरोपीने लग्नात तिच्याशी संवाद सादत तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर सततच्या मोबाईल वरील संभाषणाने त्यांच्यात प्रेमाचे अंकुर फुटले. ती अलगद त्याच्या प्रेमात पडली. ऑक्टोबर २०२१ मध्ये तरुणाने लग्नाचा प्रस्ताव ठेवत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्याच्या लग्न करणार असल्याच्या शब्दावर विश्वास ठेऊन तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो सातत्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करू लागला. १७ डिसेंबरला ती महाविद्यालयात जात असतांना तिला वाटेत थांबवून स्वतःबरोबर फिरायला चालण्याचा त्याने आग्रह धरला. तिने नकार देताच त्याने आपण लवकरच लग्न करणार असल्याचे पटवून दिले. त्यानंतर त्याने तिला दुचाकीवर बसवून मंदर गावाजवळील निलगिरी वनात नेले, व आडोशाला नेऊन तिच्याशी परत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने ११ मार्च २०२२ ला लग्न करण्याची तिला कबुली दिली. परंतु तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचा आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे तो भूलथापा देत असल्याचे तिच्या लक्षात आले. लग्नाचा प्रस्ताव ठेऊन त्याने आपली शारीरिक भूक भागविल्याचे लक्षात येताच तरुणीने आज १९ मार्चला आपल्या वडिलांसह वणी पोलिस स्टेशनला येऊन आरोपी सुमित तुळशीराम पचारे (२४) रा. कोसारा ता. मारेगाव याच्या विरुद्ध शारीरिक शोषण केल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत तत्काळ आरोपीला अटक केली. आरोपी सुमित पचारे याच्या विरुद्ध पोलिसांनी तरुणीचे शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली भादंवि च्या कलम ३७६ (२)(J)(N), ४१७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सपोनि शिवाजी टिपूर्णे व सपोनि माया चाटसे करीत आहेत.
लग्नात झालेल्या ओळखीतून त्याने लग्नाचेच आमिष दाखवून तरुणीचे केले शारीरिक शोषण लग्नात झालेल्या ओळखीतून त्याने लग्नाचेच आमिष दाखवून तरुणीचे केले शारीरिक शोषण Reviewed by सह्याद्री चौफेर on March 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.