प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर
वणी : दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना वणी यवतमाळ बायपास मार्गावरील मधुबन बियरबार जवळ आज १८ मार्चला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आढळल्याची माहिती मिळाली आहे. दुचाकी वरील दोनही युवक एकमेकांचे मित्र असल्याचे समजते. रंगपंचमीचा सण असल्याने ते पळसोनी वरून वणीला आल्याची चर्चा आहे. वणी वरून पळसोनी या आपल्या गावाकडे जात असतांना मधुबन बियरबार जवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली, यात दुचाकीवर बसून असलेल्या युवकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच त्याने जिव सोडला. अजय मुकिंदा आत्राम (२९) रा. पळसोनी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याचा मित्र विशाल श्रावण बेलेकर वय अंदाजे २८ वर्ष हा या अपघातात जखमी झाला.
शहर व तालुक्यात आज रंगपंचमी साजरी करतांना युवकांमध्ये अतिउत्साह पाहायला मिळाला. रस्त्यारस्त्यांवर युवकांचे टोळके एकमेकांवर रंग उधळतांना दिसत होते. काही झिंगलेली तरुण मंडळी झर्रर्र दुचाक्या चालवून आरडाओरड करतांना दिसली. झिंग न करता रंगपंचमीचा उत्साहाचं येत नसल्याने रंगपंचमी हा काहींसाठी झिंग करण्याचा सण होऊन बसला आहे. हिच परंपरा जोपासतांना कित्येकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. रंगपंचमीच्या दिवशी पळसोनी वरून वणीला आलेल्या एका युवकालाही अपघातात आपला जीव गमवावा लागला. हे दोघेही मित्र दुचाकीने पळसोनी वरून वणीला आले. वणी वरून पळसोनीला परत जातांना वणी यवतमाळ बायपास रोडवरील मधुबन बियरबार जवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. यात पळसोनी ग्रामपंचायतेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अजय आत्राम या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर विशाल बेलेकर हा त्याचा मित्र जखमी झाला. अजय आत्राम या युवकाचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा अकाली मृत्यू झाल्याने पळसोनी या गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 18, 2022
Rating:
