उद्या चंद्रपूर प्रियदर्शनी सभागृहात "क्षण.. एक पुरे" चे होणार सादरीकरण


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : ६० वी महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धा २०२२ आजपासून चंद्रपूरात सुरु होत आहे. या मध्ये विदर्भातील नामांकित दोन अंकी नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. या राज्य हौशी नाट्य स्पर्धेत अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्था वणी च्या वतीने व प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित "क्षण.. एक पुरे" या दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. नाटकाचे लेखन डॉ माणिक वड्याळकर यांचे असून या नाट्य प्रयोगाचे दिग्दर्शक शुभम उगले यांनी केले. तसेच या नाटकात अशोक सोनटक्के, हेमंत चौधरी, उमाकांत म्हसे, सौ मीना वानखेडे, प्रा. सीमा सोनटक्के, कु राधा सोनटक्के, व स्वप्नील दहीवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

वणीतील नाट्य चळवळ सतत जिवंत ठेवण्यासाठी नेहमीच धडपड करणारे दोन कलावंत एक जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के व प्राचार्य हेमंत चौधरी हे वणीकरांसाठी अभिमान आहे. याच बिग जोडीनी ही नाट्य परंपरा कायम राहावी म्हणून यावर्षी डॉ माणिक वड्याळकर लिखीत प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित "क्षण..एक पुरे"हे दोन अंकी नाटक अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्था वणीने निर्मिती केले आहे आणि या नाटकाचा प्रयोग महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा चंद्रपूर च्या प्रियदर्शनी नाट्य सभागृहात उद्या दि. २४ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता सादर होणार आहे तरी वणीकर रसिकांनी प्रत्यक्ष सभागृहात नाटक बघुन वणीतील हौशी कलावंतांना प्रोत्साहन द्यावे असे नाट्य मंडळीने 'सह्याद्री न्यूज' ला बोलतांना सांगितले.






उद्या चंद्रपूर प्रियदर्शनी सभागृहात "क्षण.. एक पुरे" चे होणार सादरीकरण उद्या चंद्रपूर प्रियदर्शनी सभागृहात "क्षण.. एक पुरे" चे होणार सादरीकरण Reviewed by सह्याद्री चौफेर on February 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.