टॉप बातम्या

सूरमाज फाउंडेशनने महिलांना स्वावलंबी होण्यासाठी हातभार लावला

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

चोपडा : 22 फेब्रुवारी 2022 धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच हातभार लावणाऱ्या सूरमाज फाऊंडेशनने यावेळीही आपल्या कुटुंबाच्या गरजा आणि मुलांच्या शिक्षणासाठी कोणतेही साधन नसलेल्या अनेक महिलांची परिस्थिती बघून जेणेकरून ते बाहेर जाऊन काही काम करू शकतील, म्हणून स्किल इंडिया डेव्हलपमेंट प्रमाणे फाऊंडेशनने त्यांना शिवणकाम वर्ग प्रशिक्षणाची फी देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्या आता स्वतःचा रोजगार सुरू करू शकतात. आणि त्याचप्रमाणे सूरमाज फाऊंडेशन महिलांना मदत करत राहते.

हा कार्यक्रम यशस्वी करता हाजी उस्मान शेख साहब (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन), डॉ. रागीब साहब (सचिव), डॉ मोहम्मद जुबेर शेख (सल्लागर), अबुलौस शेख आणि झियाउद्दीन काझी साहेब या सर्वांच्या खूब सहकार्य लाभले.
Previous Post Next Post