टॉप बातम्या

शंकरराव मडावी यांची स्वीकृत सदस्य म्हणून मान्यता

सह्याद्री न्यूज : कुमार अमोल 
       
मारेगाव : मारेगाव नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसची सर्वाधिक प्रतिष्ठेची व विजयाची सर्वाधिक खात्री असलेल्या जागेवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये सेवानिवृत्त तहसीलदार व शहर कांग्रेसचे अध्यक्ष निष्ठावंत शंकरराव मडावी अल्प मताने नगरपंचायत निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेत्याना व कार्यकर्त्यांना अतीव दुःख झाले होते. 
त्यामुळे ही भरपाई भरून काढावी अशी मागणी निवडणुक निकालाच्या दिवसापासून कांग्रेस पक्षात जोर पकडू लागली. त्यातच जे निवडून आले ते सर्व नवीन पहिल्यांदाच निवडून आलेले, प्रशासनाचा अनुभव नसलेले त्यातच नगराध्यक्ष पदाची चालून आलेली संधी गमावल्याने आणि पक्षाचा आदेश झुगारून काही सदस्य गैरहजर राहिल्याने पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले ही बाब पक्षश्रेष्टीच्या कानावर पडली आणि आता सभागृहात काँग्रेस ला शिवसेना,बीजेपी समोर आव्हान उभे करणारा आपली प्रभावीपणे,अभ्यासपूर्ण मांडणारा अनुभवी,निष्ठावान,प्रामाणिक व्यक्तीलाच स्वीकृत सदस्य पदी पाठवणे अत्यावश्यक आहे यावर पक्षश्रेष्ठीचे एक मत झाले आणि आज काँग्रेसच्या नेत्यांनी शंकरराव मडावी यांची स्वीकृत सदस्य म्हणून मान्यता देऊन त्यांच्या हातून गेलेल्या संधीची भरपाई अशा प्रकारे करून दिली.

काँग्रेस श्रेष्ठींनी आज त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नगरपंचायती मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली व काम करणार्‍या प्रामाणिक सामान्य कार्यकर्त्यांची सुद्धा पक्ष दखल घेऊन त्यांचा सन्मान करतो हे दाखवून दिले. शंकरराव मडावी हे सेवानिवृत्त तहसीलदार आहे त्यामुळे प्रशासनाचा पूर्ण अभ्यास असणारे,अत्यंत संयमी,शांत स्वभावाचे,प्रामाणिक कार्यक्रते म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात ख्याती आहे. मागील ५ वर्षात बिरसा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी केलेले समाज कार्य तसेच कोरोना काळात मारेगाव शहरासाठी मोफत उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका यामुळेच त्यांची निवड स्वीकृत सदस्यपदी झाल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलल्या गेले.
Previous Post Next Post