येत्या 23 व 24 फेब्रुवारीच्या राज्यव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी होवून संप शंभर टक्के यशस्वी करावा - दिपक जेऊरकर यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : प्रलंबित मागण्या व NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरीता दिनांक २३,२४ फेब्रुवारी २०२२ ला राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी राज्यव्यापी लाक्षणिक संपावर जाणार आहेत. त्याअनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यात दिनांक २३ व २४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर दु.१२ वाजता निदर्शने करण्यात यावे असे या बैठकीत ठरविण्यात आले.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, उपाध्यक्ष अजय चहारे, सतिश असरेट, अविनाश बोरगमवार, राजेंद्र समर्थ, सहसरचिटणीस अतुल भिसे, अतुल किनेकर, रविंद्र आमवार, संघटक श्रीकांत येवले, संजय बिस्वास, प्रसिध्दी प्रमुख अनंत गहुकर व सांस्कृतिक सरचिटणीस महेश पानसे आदींची उपस्थिती होती.
उपराेक्त संपात चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी-शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या संपात मोठ्या संख्येने सहभागी होवून संप १०० टक्के यशस्वी करावा असे, आवाहन राज्य सqरकारी संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एका बैठकी दरम्यान चंद्रपूर मुक्कामी केले आहे.
येत्या 23 व 24 फेब्रुवारीच्या राज्यव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी होवून संप शंभर टक्के यशस्वी करावा - दिपक जेऊरकर यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 21, 2022
Rating:
