सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : नदी पात्रातून दिवस रात्र वाहनाव्दारे अवैध रेती नेण्यांचा सपाटा काही रेती तस्करांनी लावला हाेता. ही बाब काेरपना महसूल विभागात कार्यरत तलाठी विशाल काेसनकर यांना माहित हाेताच त्यांनी सापळा रचून आज सोमवार दि.२१ फेब्रुवारीला भल्या सकाळी दाेन अवैध रेती वाहनांना दंडात्मक कारवायासाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काेरपना भागात मुजोरी करणां-या अवैध रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे. या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार असे कळते की वनोजा येथील पैनगंगा नदी रेती घाटातुन अवैधरित्या वाहतूक करणारे योगेश नारायण मेश्राम, (ट्रॅक्टर क्र. MH34-L2365 ,रा. वनोजा) व राहुल रमेश नवले, ट्रक्टर क्र. MH34-942-8005 रा. कळमना,तह.वणी) यांचे मालकीचे हे दोन्ही ट्रॅक्टर सध्या तहसील कार्यालयात महसुल पथकाने पुढील कारवाईसाठी जमा केले आहे. सदरहु ट्रॅक्टर पकडल्यावर तलाठी काेसनकर यांनी काेरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर व मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांना भ्रमनध्वनी वरुन माहिती दिली वेळेचा कुठलाही विलंब न करता पचारे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन रितसर सदरहु दाेन्ही अवैध रेती भरुन असलेल्या ट्रॅक्टरचा जप्तीनामा केला. या वेळी त्यांना पटवारी प्रकाश कामालवार,व वाहन चालक सुरेश नागोसे यांनी सहकार्य केले.
गेल्या तीन दिवसांपूर्वीच काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व पटवारी विरेन्द्र मडावी यांनी काेठाेडा बुजरुक येथून २५ ब्रास अवैध रेतीचा साठा जप्त केला आहे परंतु त्यातील खरा रेती तस्कर काेण याचा अद्याप सुगावा लागला नाही हे विशेष! काेरपना भागातील महसुल पथकाच्या सततच्या कारवायांमुळे रेती तस्करांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. मंडळ अधिकारी पचारे व त्यांचे पथकाने अवैध रेती प्रकरणात या आधी ब-याच कारवायां केल्यामुळे (दंडात्मक कारवायापाेटी) माेठ्या प्रमाणात दंड वसूल झाला असल्याचे बाेलल्या जाते.
विशाल काेसनकर यांनी केलेल्या आजच्या कारवायांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
रेती तस्करांचे रेतीचे वाहने पकडण्यांत काेरपनाचे महसुल पथक यशस्वी !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 21, 2022
Rating:
