येत्या १२ व १३ मार्चला जुनासुर्ला येथे झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयाेजन!


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : झाडीबोली साहित्य मंडळाच्या केंद्रीय समितीचे २९ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालूक्यातील जुनासुर्ला येथे करण्यात आले असून ते दि.१२ व १३ मार्च रोजी होत आहे. या अनुषंगाने नुकतीच  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथे एक सभा पार पडली. सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन नियोजित  संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सरपंच रंजित समर्थ  तर  कार्याध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य गणेश खोब्रागडे तदवतचं सहकार्याध्यक्ष म्हणून उपसरपंच  खुशाल टेकाम  यांची सर्वानुमते या सभेत निवड करण्यात आली. आयाेजित सभेला मुरझा येथील संयोजक कुंजीराम गोंधळे यांनी २८ व्या  झाडीबोली साहित्य संमेलनाचे या वेळी अनुभव कथन केले. शिवाय संमेलनात परिसरातील लोककला सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर यांनी केले. सरपंच रंजित समर्थ हे सेवाभावी वृत्तीने कार्य करीत असून त्यांनी लोकसहभागातून ग्राम विकास, मंदीर जीर्णोद्धार,कोरोना काळात गरजुंपर्यंत मदत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले आहे. तर कार्याध्यक्षपदी निवड झालेले गणेश खोब्रागडे सुध्दा हे ग्रामपंचायत सदस्य असून जुनासुर्ला सेवा सहकारी सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत.प्रहार सेवाधर्मी मंचाचे ते सचिव असून वाचनालयासारखे विविध उपक्रमांचे आयोजन ते नेहमीच करीत असतात .सामाजिक कार्यात त्यांचे योगदान माेलाचे राहिले आहे.निवड झालेल्या या सर्व मान्यवरांचा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. चंद्रकांत लेनगुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
      
आयाेजित  सभेचे संचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा सहसचिव कवयित्री वृन्दा पगडपल्लीवार यांनी मानले. सभेला जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण चनकापुरे,कवी संतोष मेश्राम, मुख्याद्यापक प्रकाश शेंडे, ग्राम.पंचायत सदस्य राजेश गोवर्धन, कालिदास  वरगंटीवार, रमेश देशमुख, सुभाष देशमुख, नागनाथ घोनमोडे, संजय खोब्रागडे, शंकर शेंडे, देवराव तांगीडवार, प्रकाश कन्नाके, प्रफुल मोटघरे, रंजित शिंदे, विशाल उपरीकार, प्रकाश राचेवार, निलेश देशमुख, दिवाकर कोडापे, गणपत शेडमाके, उपाध्यक्ष शा. व्य. स. सदस्य  सोमनाथ शेडमाके आदी  उपस्थित होते.
येत्या १२ व १३ मार्चला जुनासुर्ला येथे झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयाेजन! येत्या १२ व १३ मार्चला जुनासुर्ला येथे झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयाेजन!  Reviewed by सह्याद्री चौफेर on February 21, 2022 Rating: 5
Powered by Blogger.