आदिवासी समाजावर अन्याय-शासकीय धान्य दुकानातील मिळणाऱ्या रेशनवर शासकीय अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदाराचा डोळा ! शिवसेनाच्या सिंधुताई जाधवंनी केली या बाबत कार्यवाहीची मागणी
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपुर : विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात व शेवटच्या टाेकावर असलेल्या जिवती तालुक्यात असणाऱ्या भुरीयेसापू येथील आदिवासी बांधवांवर सातत्याने अन्याय हाेत असून, त्यांचे वरील अन्याय दुर करण्यासाठी आता शिवसेनाच्या जिवती तालुका महिला संघटिका सिंधूताई जाधव यांनी प्रत्यक्षात पुढाकार घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भुरीयेसापूर येथील गरीब व आदिवासी जनतेला शासकीय धान्य पासून वंचीत राहावे लागत असल्याची बाब नुकतीच त्यांनी उघडकीस आणून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. धान्य दुकानदार व तालुका प्रशासनच्या डाेळेझाकपणामुळे स्थानिक आदिवासी बांधवारवर अन्याय होत असल्याचा आराेप देखिल सिंधुताई जाधव यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या एका पत्रकातुन केला आहे. अतिदुर्गम तालुक्यातील आदिवासी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु असून भुरीयेसापूर येथील स्वस्त धान्य दुकानातील गैरप्रकार बाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे दरम्यान रात्रीच्या वेळी रेशन दुकाणातील माल दुकानदार गाड्याभरून विकण्यास नेत असल्याची आेरड जनतेकडुन सतत सुरु आहे. गावातील काही लोकांचे रेशन कार्ड दुकानदारने गत पाच वर्षा पासून आपल्या कडे ठेलवेले आहे. ते रेशन कार्ड ठेवण्यांचा दुकाणदाराचा उद्देश्य काय ? दरम्यान याच दुकाणदाराच्या लाेकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्यामुळे त्यांना मारण्याच्या धमक्याही दुकाणदाराकडुन दिल्या जात असल्याचे सिंधुताई जाधव यांनी प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या बाबतीत लक्ष पुरवून आदिवासी बांधवाना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता हाेवू लागली आहे.
आदिवासी समाजावर अन्याय-शासकीय धान्य दुकानातील मिळणाऱ्या रेशनवर शासकीय अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदाराचा डोळा ! शिवसेनाच्या सिंधुताई जाधवंनी केली या बाबत कार्यवाहीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 23, 2022
Rating:
