Top News

संप वार्ता : वणीत दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संपाची सुरुवात लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे झाली आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रमुख प्रश्नासाठी गेल्या तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही निकाली न लागल्यामुळे नाईलाजाने लाक्षणिक संपाचे हत्यार संघटनेला हाती घ्यावे लागले. या संदर्भाने ठाणेदार पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी तहसिल कार्यालय, वणी तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजीव रेड्डी बोडकुरवार यांना मागण्यासंदर्भाचे निवेदन देण्यात आले आणि संपाला सुरुवात झाली.

अशी माहिती अध्यक्ष श्री राजू आगलावे, सचिव आनंद नगराळे, अरविंद ब्राह्मणे, राहुल करमरकर, मनोज भाऊ सरमोकदम, अनिल चामाटे, जयंत त्रिवेदी, सुरेंद्र समर्थ, मनोज केळकर व अशोक भाऊ बागळदे इत्यादींनी दिली.
Previous Post Next Post