सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी एमआयडीसी परिसरात असलेल्या टू सन्स ऑईल मिलच्या आवारात काल सायंकाळी ५ वाजता अनिकेत कुमरे व सागर उर्फ गोल्या फुसाटे या दोन चोरट्यांनी प्रवेश केला. मिलच्या आवारात ठेऊन असलेले २० किलोचे वजन व आर्म केबल चोरून नेण्याच्या तयारीत असलेल्या या दोन्ही चोरट्यांना मिल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रंगे हाथ पकडले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. या दोन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दोघांवरही चोरीचा गुन्हा दाखल करून आज २३ फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी दोन्ही चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
आधीच चोरीचे अनेक गुन्हे शिरावर असलेला अट्टल चोरटा रुग्णालयातून पसार झाल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गब्ब्याचा शोधा शोध सुरु असतांनाच गब्ब्या स्टाईल चोरी करणारे हे दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले. चोरीची वेळोवेळी कर्तबगारी दाखविणाऱ्या या चोरट्यांना पोलिसांनी चांगली अद्दल घडविल्यास त्यांचे वारसदार तयार होणार नाही.
वणी एमआयडीसी परिसरातील ऑईल मिलमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 23, 2022
Rating:
