वणीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सदस्य नोंदणीला प्रारंभ; वणी उपविभागातील युवकांचा पक्ष प्रवेश सोहळ्यात उत्साहात संपन्न
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : येथील जैताई मंदीर जवळ दि.22.02.2022 ला सायंकाळी 4 वा. कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमा साठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. चे उपाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील (कामारकर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ कानारकर हे सुद्धा उपस्थित होते, वणी विभागातील राष्ट्रवादी कार्यरत असलेले पदाधिकारी यानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,
कार्यक्रमाची सुरवात वणी विभागा मध्ये सदस्य नोंदणी चा शुभारंभ करण्यात आला, व युवक चा जिल्हा उपाध्यक्ष पदी धीरज कुचनकार, तालुका अध्यक्ष पदी हेमंत गावंडे यांची तर शहर अध्यक्ष पदी मनोज वाकटी यांची नियुक्ती करण्यात आली, व नियुक्तपत्र देण्यात आले.
वणी विभागातील युवकाचा पक्ष प्रवेश चा कार्यक्रम झाला या मध्ये शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला आहे.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केले, त्यानी वणी विभागातील प्रश्न मांडले, वणी मध्ये काम करत असताना कोणत्या अडचणी येतात यांचा पाढा वाचला, वणीतील नेते मुंबई ला जाऊन पक्षात प्रवेश करतात त्याचाकरीता पक्षातील कार्यकर्ते खुप मेहनत घेतात,पंरतु कालांतराने पक्षाला सोडुन जातात मागील 13 वर्षा पासुन आम्ही पक्षात सुरवाती पासुन काम करत आहे,परंतु आता पर्यंत या विभागातील नेते बदलत जातात, कार्यकर्तेची जेव्हा इलेक्शन येते तेव्हा नेतेच गायब होतात, आता आम्ही नगर पालिका-जिल्हा परिषद आम्ही लढवणार आहे आणि पक्षाला जिल्ह्यातून मदत करावी अशी मागणी केली, पक्षाचे वणी चे नेते विजयजी नगराळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यानी सुद्धा पक्षात काम करताना किती अडचणी येतात हे जिल्हय़ाच्या नेता समोर मांडले, तसेच वणी तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे व मारेगाव तालुका अध्यक्ष भारत मत्ते सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर युवक चे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ कानारकर यानी कार्यकर्त्यांना संबंधीत केले, ते आपल्या भाषणात युवकांनी येणा-या इलेक्शन जास्तीत जास्त टिकीट ची मागणी करावी त्याना आम्ही टिकीट देऊ आणि जिल्हातुन त्याना जेवढी मदत करता येणार तेव्हढी निश्चितच करण्यात येईल असे त्यानी म्हटले, पुढे बोलतानी ते म्हणाले की, जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता आहे आणि पुढे पण रहाणार आहेच, कुठले पण जनतेचे काम रहाले तर ते मार्गी लावण्यात येणार असे त्यानी आश्वस्त केले.
अध्यक्षीय भाषणात कार्यक्रम चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर यांनी सबोधीत करताना कार्यकर्त्यांनी पक्षा सोबत एकनिष्ठ असणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय सहन करुन घेणार नाही. पक्षाची सत्ता जि.प. मध्ये आहे आणी महाराष्ट्र मध्ये पण आहे, कुठले पण काम असले तर वणी विभागातील लोकांना प्राधान्य देण्यात येणार, लोका साठी काम करणारा हा आपला पक्ष आहे, म्हणुन जनता आपल्या लोकांपर्यंत काम घेऊन येतात आणि आपण त्याना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुया. कार्यकर्त्यांनी जिद्दीने सभासद नोंदणी ची सुरवात करावी ज्यानी नोंद केली असेल त्यालाच पक्ष टिकीट देण्यात येणार आहे, म्हणुन आपण सदस्य नोंदणीला लवकरात लवकर सुरवात करावी.
आभार प्रदर्शन झरी तालुका अध्यक्ष संजयजी जंबे यांनी केले.
कार्यक्रमाचा यशस्वेते करीता जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, सूर्यकांत खाडे, विजय नगराळे, धिरज कुचनकार, हेमंत गावंडे,मनोज वाकटी, राजु उपरकार, रामकृष्ण वैद्य, आशुतोष नागरिक, सचीन चव्हाण, प्रंशात सलाम, प्रणय बल्की, अखिलेश जयस्वाल यांनी प्रचंड मेहनत घेतली.
वणीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सदस्य नोंदणीला प्रारंभ; वणी उपविभागातील युवकांचा पक्ष प्रवेश सोहळ्यात उत्साहात संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 23, 2022
Rating:
