सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : काेरपना भागात अवैध गाैण खनिज वाहनांवर कारवाई करण्याची माेहीम जाेरात सुरु असुन आज बुधवार दि.२३ फेब्रुवारीला सोनूर्ली वनसडी येथे दुपारी अंदाजे 12.48 वाजता 100 घन फूट मुरुम भरून अवैधरित्या वाहतूक करताना एका वाहनाला महिला तलाठी रोशनी काेल्हे यांनी पकडले. चाैकशी अंती सदरहु वाहन चालकाजवळ कोणतीही जावक पावती नव्हती किंवा परवाना आढळून आला नाही.
या वाहनांवर गाडी क्रमांक नमूद नसुन उपराेक्त
ट्रॅक्टर हे सतीश मधुकर झाडे,रा. येरगव्हान, यांचे मालकीचे आहे. या वाहनाचा चालक कृष्णा संबु मेश्राम, रा. हातलोनी असून ते वाहन भाडेतत्वावर हर्षवर्धन जुल्म्हे यांचे कडे असल्याचे कळते.
जप्तीतील वाहन वनसडीच्या तलाठी राेशनी कोल्हे यांनी ताब्यात घेतले असुन या वाहनाचा पंचनामा काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांनी करुन ते ट्रॅक्टर, तहसील कार्यालयात जमा केले आहे.
तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांचे मार्गदर्शना खाली सदरहु कारवाई करण्यांत आली असुन तलाठी रोशनी काेल्हे यांना सदरहु वाहन ताब्यात घेतांना पटवारी प्रकाश कमलवार व काेरपना तहसीलचे वाहन चालक सुरेश नागोसे यांनी माेलाचे सहकार्य केले.
या आधी मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे तलाठी विरेन्द्र मडावी, अमाेल गाेसाई व महसुल पथकांनी याच भागात अवैध गाैण खनिज प्रकरणात माेठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहे.
अवैध मुरुमाच्या वाहनाला महिला तलाठी रोशनी काेल्हेंनी घेतले दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 23, 2022
Rating:
