टॉप बातम्या

महाराष्ट्र राज्य कर्मचारी जाणार दाेन दिवशीय लाक्षणिक संपावर !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : येत्या 23 व 24 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य कर्मचारी दोन दिवसांचा लाक्षणिक संप करणार असुन या संपाची नोटीस चंद्रपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना आज मंगळवार दि. १ फेब्रुवारीला पाठवली असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यांत आली.

संपाची नाेटीस देतांना चंद्रपूर जिल्हा राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजू धांडे, उपाध्यक्ष अविनाश बोरगमवार,सह सरचिटणीस ब अतुल भिसे, या शिवाय शैलेश धात्रक, संघटक नितीन पाटील, प्रसिद्ध प्रमुख अनंत गहुकर व सांस्कृतिक सरचिटणीस महेश पानसे उपस्थित होते.
Previous Post Next Post