खैरगांव मार्गांवर पट्टेदार वाघाचे दर्शन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

मारेगाव : तालुक्यातील बोटोणी वरून डावीकडे सराटी खैरगाव मार्गांवर पट्टेदार वाघ उभा ठाकून बसला होता.

दरम्यान, ६ वाजता स्वरांगण संगीत विद्यालय मारेगाव चे संचालक रवि घुमे, प्रोफेसर नितीन कुमार कुंभार,पुणे, सह्याद्री न्यूज चे संपादक कुमार अमोल व उमेश हेअर सलून मच्छिन्द्रा चे संचालक उमेश क्षीरसागर हे "तानाबाना" नीड कोलाम संस्थेला सदिच्छा भेट देण्याकरिता गेले असता वाटेत पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.

यावेळी एक दुचाकी वाटसरू या मार्गाने आले असता त्यांना वाघ असल्याचे सांगून त्यांना दोन मिनिट थांबवून त्यांना लगेच वाटेत काढून त्यांना पुढे जाण्यास सांगितले. तेव्हा वाघाने आमच्या कारच्या दिशेने वाघाने झेप घेण्याच्या प्रयत्न केला असता, आम्ही सर्वांनी कार चा वेग वाढून पुढे मार्गस्थ झाले. मात्र या मार्गाने जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगने अत्यंत गरजेचे आहे असे मत सर्वांनी व्यक्त केले.
खैरगांव मार्गांवर पट्टेदार वाघाचे दर्शन खैरगांव मार्गांवर पट्टेदार वाघाचे दर्शन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.