अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी तरुण जागीच ठार


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : काल सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान, म्हैसदोडका येथील एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाताची वार्ता परिसरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.

विकास बबन डाहुले असे रा म्हैसदोडका असे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकास गावाकडे परत जात असतांना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भयानक होती की, विकास चा अपघातात संपूर्ण चेंदामेंदा झाला असल्याचे वृत्त आहे.

मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शेतकरी विकास यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, चार विवाहित बहिणी, व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
सदर घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी तरुण जागीच ठार अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी तरुण जागीच ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on February 01, 2022 Rating: 5
Powered by Blogger.