टॉप बातम्या

कानगाव येथे मंगलाताई ठक यांची सदिच्छा भेटू

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

हिंगणघाट : आज दिनांक १ जानेवारीला हिंगणघाट तालुक्यातील मौजा कांनगाव येथे ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या वतीने महिलांना हळदी कुंकू देवून वान वाटप करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक व निराधार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांनी महिलांचे प्रश्न सोडविताना निराधारांचे प्रश्न व घरकुला चे प्रश्न असो वा सरकारी योजना असो गरजुंपर्यंत पोहचविण्याचे काम निराधार संघटना सातत्याने करत आली आहे आणि याही पुढे मोठ्या प्रमाणात याचा लाभ गरजूना मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ठक सांगितले आहे.

या छोटेखानी कार्यक्रमात कानागाव येथील महिलांनी मंगलाताई ठक यांना साडी चोळी भेट देऊन अशीच साथ आम्हाला सदैव लाभोत अशी त्यांना नम्र विनंती करण्यात आली.
Previous Post Next Post