जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न...

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ तर्फे वणी नगर परिषद पालिका शिक्षण विभागातर्फे 31 जानेवारी 2022 ला ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न झाली.
 उद्दघाटन वणी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ देवतळे यांनी गूगल मीटवर जाईंन्ट होऊन केले. प्रास्ताविक नगर परिषदेचे केंद्र समन्वयक किशोर परसावार यांनी ऑनलाइन शिक्षण परिषदेचे महत्व पटवून दिले.

 पहिल्या सत्रामध्ये पंं,स,वणी गटसाधन केद्राचे साधनव्यंक्ती विनोद नासरे यांनी भाषा विषयामध्ये घरगूती शैक्षणिक साहित्यातून पायाभूत भाषिक साक्षरता विद्यार्थ्यामध्ये कशी रूजवावी यासाठी मोबाईल वरून विविध चित्ररूप क्लीप व व्हिडिओ दाखवून विविध उदाहरणे देवून भाषिक साक्षरतेचे महत्व विशद केले.
 दूसर्‍या तासिकेत साधन व्यक्ती संतोष काळे यांनी समग्र शिक्षा अभिमान स्टार प्रकल्प नूपून भारत प्रकल्प NAS व MAS च्या चाचण्या संदर्भात मार्गदर्शन करून दर्जेदार शिक्षण कशा पध्दतीने विकसित करता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.

 तिसर्‍या तासिकेत जि,प,धोपताळा शाळेचे शिक्षक प्रकाश तालावार यांनी गणित विषय गगनपूर्व तयारी,कृतीयूक्त गाठीत गणितीय संबोध विविध उदाहरणाद्धारे साहित्य,चित्ररूप क्लीप,व्हिडिओ दाखवून स्पष्ट करून मार्गदर्शन केले.
गाठीयवीय भाषा,साहित्य कृत्तीद्धारे समजावून सांगून घटकाबध्दल सर्व समावेशक तासिका घेतली.

 दूसर्‍या सत्राची सूरूवात पं,स,वणी गटसाधन केद्राच्या साधनव्यक्ती अल्का काळे यांनी इंग्रजी विषयात READ TO ME APP बद्दल सविस्तर माहिती देवून ऑनलाइन शिक्षण दर्जेदार कसे करावे? तसेच विद्यार्थ्यांनी BORDकसे डाऊनलोड करावे या संदर्भात विविध व्हिडिओ क्लीप दाखवून मार्गदर्शन केले.
 दूसर्‍या तासिकेमध्ये शाळा क्र,4 च्या शिक्षिका लता ठमके यांनी नवोदय/शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले . तर तिसर्‍या तासिकेत माहिती तंत्रज्ञान:गूगल मीट अॅप्लीकेशनचा शिक्षणात वापर कसा करावा या बद्धल, व्हिडिओ क्लीप दाखवून स्पष्ट्टीकरण करून तंत्रस्नेही शिक्षक अविनाश तूंबडे न,प,शाळा क्र,8 यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या तासिकेत राज्यस्तरीय शैक्षणिक उपक्रमाचा आढावा याबद्दल किशोर परसावार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सत्राच्या शेवटच्या तासिकेत न,प,वणी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे यांनी शिक्षण परिषदेमधून मिळालेल्या ज्ञांनाचा उपयोग शालेयस्तरावर करून त्यावर दर्जेदार प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी कशा प्रकारे साध्य होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले.
 या परिषदेत शिक्षक वर्ग वसंत आडे,चंदू परेकर,दिलीप कोरपेनवार यांनी ऑनलाइन परिषदे बाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

सूत्रसंचालन शाळा क्र,2 चे मूख्याध्यापक अविनाश पालवे यांनी केले. तांत्रिक बाजू तंत्रस्नेही शिक्षक अविनाश तूंबडे यांनी सांभाळले व शिक्षण परिषदेच्या यशस्वीते करीता संजय पिदूरकर,विनोद चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न... जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न... Reviewed by सह्याद्री चौफेर on February 02, 2022 Rating: 5
Powered by Blogger.