सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे पंचवीस ते तीस वर्षे झालेल्या रस्त्याचे काम मंजूर झाले. या निधी कामाचा आमदार खासदार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा भर पावसात संपन्न झाला होता. कालपासून या मंजूर रस्त्याचे काँक्रीटकरण सुरु झाले. मात्र, या रस्त्याला पूर्वीचे असलेले डांबरीकरण उखडून न घेता त्यावर च काँक्रीटकरण करण्याचा घाट ठेकेदार यांनी घातला आहे. अनेकांनी सदर रस्त्याला उखडून त्याचे प्रथम लेव्हल व दबाई करावी नंतरच काँक्रीट टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे. परंतु असे काम न करता ठेकेदाराने आपल्या मजुराद्वारे थातूर मातुर काम आटपून घेण्याचा सपाटा लावल्याचा अंदाज दिसून येत आहे. सदर रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे या करिता महाराष्ट्र ट्रायबल चे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे मारेगाव तालुका प्रमुख अमोल कुमरे यांनी सह्याद्री न्यूज ला बोलतांना सांगितले. लाखों रुपयाचे निधी काम हजारोंत च करून घेण्यात येत असल्याचे ओरड गावाकऱ्यातून होत आहे. विशेष उल्लेखनीय असे की, इतक्या वर्षांनंतर हा रस्ता मंजूर झाला आणि त्या रस्त्याचे काम आज रोजी सुरु झाले आहे. परंतु सुरुवातीपासूनच या रस्त्याचे काम समाधानकारक नसून काम थातूर मातुर करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने सुरु असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दर्जेदार काम करण्याचे आदेश देण्यात यावे.. अन्यथा सदर काम निकृष्ट दर्जाचे करू नये अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
त्या रस्त्याचे दर्जेदार काम करण्याची मच्छिन्द्रा येथील ग्रामस्थांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 02, 2022
Rating:
